*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
दि. 14/03/2026 रोजी निंभोरे गावातील तसेच करमाळा तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
यामध्ये निंभोरे गावचे सुपुत्र रणजित गोरख वळेकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे तर पल्लवी डाकवले/मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड झाली आहे. निंभोरेचे अक्षय वाघमारे यांची कोर्टात लिपिक पदी निवड झाली आहे.तर कीर्ती साळुंखे हिची कर सहाय्यक पदी निवड झाली आहे.तर स्वप्नील वळेकर यांची जलसंधारण खात्यामध्ये वर्ग 2 पदी निवड झाली आहे.केम गावचे सुपुत्र सचिन जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे तर पांगरे गावचे सुपुत्र प्रविण पवार यांची देखील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
दरवर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी निंभोरे गावाने तालुक्यातील सर्व यशस्वीतांचा सन्मान केला आहे. या सत्कार समारंभासाठी करमाळा तालुका तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम अध्यक्ष म्हणून तर गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे, श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे,ग्रामपंचायत निंभोरे व समस्त ग्रामस्थ निंभोरे यांचे वतीने जिल्हा परिषद शाळा निंभोरे येथे करण्यात आले होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा