Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ मार्च, २०२६

*करमाळा शहरातील कानाड गल्ली येथे पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील नेताजी मित्र मंडळ तसेच कानाड गल्ली मित्र परिवाराच्या वतीने होळी हा महत्त्वाचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला 

यावेळी गल्लीतील तरुण मंडळांनी होळी पेटवून सदरचा सण साजरा केला यावेळी होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी टाकण्यात आली आहे 




भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा सण म्हणजे होळी होय होळी हा सण उत्साह व नवचैतन्य वाढवणारा असा सण आहे होळीचा सण म्हणजे वसंत ऋतू चे एक प्रकारचे आगमन म्हणावे लागेल हा सण आजही हिंदू बांधव मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरा करतात असाच महत्त्वाचा सण समजला जाणारा होळी आज करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील तरुण मंडळांनी मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरा केला यावेळी योगेश राखूडे , संकेत दयाळ , निलेश राखूडे , अथर्व माने , संग्राम दयाळ , प्रज्योत राखूडे , अलोक माने , निलेश राखूडे , उत्कर्ष राखूडे , सिद्देश माने , गौरव राखूडे , व मनीषा राखूडे , सविता दयाळ , पूनम राखूडे , सुषमा माने , रामेवश्वरी माने महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा