*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा येथे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी धावती भेट दिली यावेळी करमाळा तालुक्यातील व शहरातील शेक डो समाज बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती लावली होती जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण व ढोल ताशांनी करमाळा शहरातील छत्रपती चौकात जल्लोश केला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पाटील यांचे जल्लोषात स्वागत करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याशी संवाद साधून पाटील यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधून विविध बाबी समजून घेतल्या व कार्यकर्त्यांना अल्पशा वेळेत देखील मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मराठा समाजाचा ज्वलंत असलेला प्रश्न म्हणजेच ओबीसी कुणबीचे दाखले मिळण्यासाठी कुर्डवाडी प्रांत कार्यालयाकडून होत असलेल्या अडवणुकी संदर्भात देखील जरांगे पाटील यांच्याशी उपस्थित कार्यकर्त्यांनी संवाद साधला यावेळी पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सदरचा प्रश्न सोडवून घ्यावा अशा प्रकारचा सल्ला दिला अन्यथा शासन प्रशासन जर समाजाची अशाच प्रकारे पिळवणूक व फसवणूक करत असेल तर मला देखील मैदानात उतरावे लागेल अशा प्रकारे कार्यकर्त्यांना धीर देऊन शासनाला देखील उपस्थीतां समोर इशारा दिलेला आहे सदरच्या भेटीनंतर पाटील पुढील कार्यक्रमासाठी त्वरित करमाळा शहरातून रवाना झाले .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा