Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ मार्च, २०२६

*जेऊर महिला महोत्सवातील पाककला स्पर्धेत तब्बल ५५ पदार्थ, सौ ज्योतीताई पाटील यांचेकडुन महिलांचे कौतुक*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


पाककलेतील सुगरणींचा सहभाग महिला महोत्सवाची शोभा वाढवणारा ठरला असल्याचे प्रतिपादन सौ जोतीताई नारायण पाटील यांनी केले. आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला महोत्सवाचा आजचा चौथा दिवस पाककलेने गाजवला. यावेळी "आम्ही साऱ्या सुगरणी" या पाककलेच्या विभागाचे उद्घाटन सौ जोतीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सौ जोतीताई पाटील यांनी सांगितले की गेली २४ वर्षे झाली पाककला ही आमच्या महोत्सवाची सर्वात महत्वाची व लोकप्रिय अशी बनली आहे.या स्पर्धेस सुलभा घाडगे यानी बनवलेला आईस केक कापून झाली तर यावेळी 

सपना मदने (कॉर्न फ्लोअर वडे), मेघा जाधव (पनीर ठेचा), कल्पना आखाडे (कांदा गाजर अप्पे), सुरेखा आरकिले (ब्रेड पॅटीस), दिपाली तंटक (पालक पुरी), भाग्यश्री सातव (ब्रेड गूलाबजामुन), सुवर्णा बादल (कोथींबीर मठरी), अश्विनी बादल (हेल्दी वेज बिर्याणी), वैशाली पात्रुडकर (गुजबेरी स्वीट पिकल), अपर्णा पाथ्रुडकर (कैरीची डाळ), उषा धोकटे (बालूशाही), अर्चना दिंडोरे (रगडा पॅटीस), सोनाली होगले (मीश्र डाळ अप्पे), स्वाती सुरवसे (गुजराती खांडवी), रोहिणी हेळकर ( ब्रेड बटाटा बाल्स ), आम्रपाली सुरवसे (खारी शंकरपाळी), प्रतिक्षा शेटे देशमुख ( गोड काजू शंकरपाळी), शालन झिंजाडे (फ्रेंच फ्राईड), सुमन घोरपडे (अनारसे), संगिता लोंढे (मक्याची पुरी), सुचिता ठाकर (मुरमुरे सुसला), मनिषा लोंढे (मका भजी), कांचन काशीद (पालक पुरी), अर्चना कुलकर्णी (काकडीचे अप्पे), सुनिता कुलकर्णी (पोहे आणि पालकाचे कटलेट), उज्वला कळसाईत (मुगदाळ भजी), स्वाती व्हरे (नाचणीचे लाडू), अंकीता वेदपाठक (उपवासाचा चिल्ला), उर्मिला वेदपाठक (पाकपुरी), शैला वेदपाठक (उपवासाचा डोसा), रुचिता भोसले (पातळ पोहे चिवडा), रागिणी ठाकर (भोपळ्याचे घारगे), मंगल सुरवसे (थालीपीठ), शीतल भीसे (बटाटा लॉली पॉप), मनिषा वनवे (खानदेशी गव्हाचा चिवडा), शकुंतला पाटकुलकर (तिखट पुरी, कवटाची चटणी), प्रियंका पाटील ( हॅपी बिस्कीट केक), सिमीता पाटील (मेथीची पुरी), भारती बलदोटा (चायनीज फ्रेंच रोल), मंजुळा पाच्छापुर (जोड गव्हाचे उपीट), अर्चना जाधव ( दुधी भोपळ्याचे आप्पे), नागिनी ननवरे (जिलेबी), शीतल पाटील (खारे शंकरपाळी), पल्लवी पाटील (मुगदाळीचा हलवा), रेश्मा मुंडे (शेव), मंजुषा बिराजदार (पातळ पोहे चिवडा), अजिता पाटील (गव्हाचा चिवडा), उर्मिला आदलिंग (पालक पुरी), सोनल‌ कांबळे (मोमोज), संध्या हेळकर (बीट हलवा), शेख मॅडम (नाचणी पराठा ) यांनी आपले पदार्थ स्पर्धेत मांडले. या स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन कृती व नावनोंदणी साठी समृध्दी कुलकर्णी व कुमारी पावणी हिने अधिक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा