Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ मार्च, २०२६

*इंदापूर शहर व तालुक्यात रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण, निमगाव केतकी येथे युद्ध* *थांबण्यासाठी सामुदायिक प्रार्थना*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



रमजान ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय, बंधुता याचा संदेश देत ईद मुबारक म्हणत ईद साजरी करण्यात आली. नमाजानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघात मृत्यूचे सावट या सणावर दिसून आले. त्यामुळे निमगाव केतकी पंचक्रोशीत अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला


तत्पूर्वी सकाळी शहरातील श्रीराम सोसायटी व सरस्वती नगर येथील ईदगाह मैदानावर शनिवारी दिनांक २१ मार्च रोजी ईद उल फित्र ची नमाज सामुहिकपणे अदा करण्यात आली.दर्गाह मशिदीचे मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिकपणे नमाज अदा करण्यात आली.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सर्वत्र पवित्र सण आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने तालुक्यात मुस्लिम बांधवांनी अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा करत अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या संवेदना स्पष्ट करत आम्ही नेहमी प्रमाणे तुमच्या सोबत असल्याचे दर्शवून दिले आहे. या बांधवांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात हिंदू मुस्लीम बांधव एकमेकांच्या सणात सहभागी होऊन जातीय सलोखा संवर्धित करत आहेत. इंदापूरचा आदर्श सर्वांनी घेणे ही काळाची गरज आहे.

भाजप नेते प्रदीप गारटकर म्हणाले, इंदापुरात मुस्लिम बांधव हिंदूच्या सणात तर हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या सणात सहभागी होतात. दिवाळी सण असो किंवा गणेशोत्सव असो, त्यामध्ये मुस्लिम बांधव सक्रीय असतात तर रोजा इफ्तार पार्टी मध्ये हिंदू बांधव सक्रीय असतात. इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, मुस्लिम धर्म हा शांतता तसेच समानतेचा संदेश देणारा धर्म असून सण आणि उत्सव ही आपली चैतन्य प्रतीके आहेत. रमजान म्हणजे त्याग, संयम आणि सदभावना याचे प्रतीक आहे. यावेळी भाजप नेते प्रवीण माने यांनी देखील मुस्लिम बांधवांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक शुभम पवार, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप, धरमचंद लोढा, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे, सागर गानबोटे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, तालुकाध्यक्ष संतोष 

आटोळे, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, संघटक काकासाहेब मांढरे, राजेंद्र कवडे देशमुख, कैलास पवार, धनंजय कळमकर आदींनी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान एचकेजीएन ग्रुप, अहमद रजा सोशल फाऊंडेशन, टेंभुर्णी नाका बॉईज, शहर कसब्यात सामूहिक पणे शिरखुर्मा, भजी गोड व तिखट याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 

निमगाव केतकी येथील ईदगाह मैदानावर मक्का मशिदीचे पेश इमाम मौलाना वारीस जमाली यांच्या मार्गदर्शनाखाली ईद उल फित्र ची दोन रकात वाजीब नमाज पठण करण्यात आले, खुतबा पठण करण्यात आले. यावेळी आखाती युद्ध थांबावे यासाठी देखील सामूहिक प्रार्थना करण्यात आली. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे देखील आखाती युद्ध थांबून जगात शांतता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बावडा येथे मौलाना मुख्तार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी पाच वर्षीय आरीच मुलाणी, तात्या गायकवाड, अरुण गायकवाड यांचा रमजान रोजे केल्याबद्दल प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, नूतन पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, नागेश गायकवाड यांनी सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर मौलाना जाबीर, पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या दर्गाह मध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे, शिवाजी मोहिते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  इंदापूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा