*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
महिलांनी इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वांचा आदर्श दररोजच्या जिवनात आचरणात आणल्यास सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर कोणतेही ध्येय सहज गाठता येत असल्याचे प्रतिपादन मनोज जगदाळे यांनी केले.
सराटी (ता.इंदापूर) येथे जागतिक महि useला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ समाजातील कर्तूत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. मालोजी तनपुरे, विद्या तनपुरे, संतोष कोकाटे, अमर जगदाळे, अभिजीत जगदाळे, रितेश जाधव, सुभाष आव्हाड सर, मनोज जगदाळे व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जगदाळे मित्र परिवाराने सराटी गावातील डॉक्टर्स, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, नर्स, आशासेविका यांचा सन्मान करण्यात आला. मनोज जगदाळे पुढे म्हणाले, जिजामाता, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या महान स्त्रिमत्वामुळे महाराष्ट्र व भारत देश घडलेला आहे. आदर्श महिला भगिनी व सर्व स्त्रीशक्ती नारीला माझा मानाचा मुजरा असे गौरवोद्गार काढले.
फोटो - सराटी येथील समाजातील कर्तूत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा