Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ मार्च, २०२६

*महावितरणचा भोंगळ कारभार ! मुख्यमंत्र्यांच्या दिवसा वीजपुरवठा आदेशाला केराची टोपली ! शेतकरी मात्र करतोय रात्रंदिवस कष्ट !!*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी याकरिता महाराष्ट्र ऊर्जा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले कृषी लोड मॅनेजमेंट संदर्भातील वीजपुरवठा वेळापत्रकला तसेच मा मुख्यमंत्री यांच्या आदेशाला महावितरण कडून कराची टोपली दाखवली जात असुन शेतीसाठी दिवसा वीज देणे आवश्यक असतानाही मात्र सध्या रात्री वीजपुरवठा केला जात आहे या मनमानीच्या विरोधात मांजरगाव उंदरगाव राजुरी सोगाव उमरड येथील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून महावितरण किती दिवस शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणार आहे असा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे 


शासनाने महावितरण ने कृषि वीज धोरण ठरवून दि ३१.१२.२०२५ रोजी एक परिपत्रक जाहीर केले असून कृषी फीडर्ससाठी 3-फेज वीजपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मात्र सध्या स्लॉट -१ अंतर्गत रात्री १०:०० ते सकाळी ६:०० या वेळेत वीजपुरवठा देण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. हा वेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा व धोकादायक आहे.


मा.मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा सार्वजनिक भाषणांमधून व शासन निर्णयांमधून स्पष्टपणे नमूद केले आहे की,

“शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राधान्याची बाब आहे.” तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शेतीकाम सुलभ करण्यासाठी रात्रीच्या वीजपुरवठ्याला टप्प्याटप्प्याने बंद करून दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र याकडे महावितरण चे अधिकारी दुर्लक्ष करत आहे अशा परिस्थितीत सध्याचे वेळापत्रक हे  शासनाच्या धोरणाच्या विरोधात व शेतकरीविरोधी ठरत आहे 

 रात्री अंधारात शेतात काम करताना हिंस्त्र प्राणी,सर्पदंश,वीजेचे अपघात व इतर जीवितहानीचा मोठा धोका होऊ शकतो, महिला व ज्येष्ठ शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीत काम करणे शक्य नसल्यामुळे त्यांच्यावर अडचण व अन्याय होतो आहे शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून मोटार चालवावी लागते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो व त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे, ऐन उन्हाळ्यात पिकाला वेळेत पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होऊन उत्पादनामध्ये घट होते. एकंदरीत यांसर्व बाबींचा विचार केला असता शासन निर्णयाचा व सौरऊर्जा धोरणाचा आदेश धुडकावण्याचा तसेच मा.मुख्यमंत्री यांच्या “दिवसा वीजपुरवठा” या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात सदर रात्रीचा स्लॉट आहे.तो बंद करून दिवसा कृषि वीजपुरवठा करण्यात यावा राज्यात सोलराइज्ड फीडर्सद्वारे दिवसा वीज देण्यावर भर दिला जात असताना हा निर्णय त्या धोरणाच्या विरोधात आहे म्हणून महावितरण ने त्वरित मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशांनुसार शेतकरीहिताचे धोरण त्वरित आमलात आणावे व दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पावले उचलली जावीत जर या बाबीकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून यासाठी संबंधित प्रशासन जबाबदार राहील आसा शेतकऱ्यांमधून सूर उमटू लागले आहे भविष्यात यामध्ये सुधारणा झाली नाही तर शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा