Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ मार्च, २०२६

*पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल, /डिझेल हे डबा, बाटली, कॅन ,मध्ये न देता वाहनाच्या टाकीतच द्यावे--- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश*

 *आलिमभाई.  शेख*

*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



ज्याअर्थी समाजमाध्यमावर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवटा निर्माण होणार असल्याची प्रसारीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे, पेट्रोलियम नियम, २००२ मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लास्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे/विकणे नियमाविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने मी जिल्हाधिकारी सोलापूर कुमार अशीर्वाद मला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

१. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक मालक यांनी पेट्रोल/डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे,

२. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल/डिझेल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात) विक्री/पुरवठा करू नये.

३. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व विक्री नोंदी नियमित ठेवाव्यात.

या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक व्यवस्थापक यांची राहील. सदर आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहील व पुढील आदेश होईपर्यंत प्रभावी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम, २००२ मधील नियम १९८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. हा आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात येत असून, सर्व संबंधितांनी त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.

(कुमार अशीर्वाद, भा.प्र.से) जिल्हाधिकारी सोलापूर


           माहिती स्तव  प्रत :-

१. पोलीस अधीक्षक, सोलापूर यांना आवश्यक कार्यवाहीस्तव,

२. जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांना आवश्यक कार्यवाहीस्तव.

३. उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्रं. १, सोलापूर क्रं. २, पंढरपूर, अकलूज, माढा यांचेकडे आवश्यक कार्यवाहीस्तव.

४. सर्व तहसीलदार, जिल्हा सोलापूर यांना कळविण्यात येते कि सदर आदेशाची बजावणी आपले

तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप मालक व्यवस्थापक यांना आपले स्तरावरून करण्यात यावी. ५. सर्व पोलीस निरीक्षक/पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीस्तव.

६. व्यवस्थापक, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड, यांना आवश्यक कार्यवाहीस्तव

७. व्यवस्थापक, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमीटेड यांना आवश्यक कार्यवाहीस्तव

८. व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड पाकणी डेपो सोलापुर यांना आवश्यक कार्यवाहीस्तव

९. सर्व पेट्रोल पंप मालक/व्यवस्थापक जि. सोलापूर यांना अनुपालनास्तव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा