*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व पटवून घेतले पाहिजे तरच भविष्यात त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो असे महत्त्वपूर्ण उद्गगार विज्ञान दिनाच्या दिवशी जेष्ठ पत्रकार नासिरभाई कबीर यांनी बोलताना केले ते करमाळा शहरातील नगरपालिका अंकित कै.नामदेवराव जगताप उर्दू शाळा येथे भरवण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये बोलत होते
यावेळी आणखीन बोलताना ज्येष्ठ पत्रकार कबीर पुढे म्हणाले की करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळा मधील विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेऊन आपल्या शाळेचे नावलौकिक मिळवावे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले
याच वेळी उर्दू शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन तसेच शाळेच्या वैज्ञानिक प्रदर्शनाला उपस्थिती दाखवल्याबद्दल पत्रकार दिन व विज्ञान दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचे यावेळी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी पत्रकारांचे शाल पेन व डायरी अशा पद्धतीने भेट वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार के
कै.नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळा करमाळा येथे विज्ञान दिवस साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार नासीर कबीर, दिव्य मराठीचे पत्रकार विशाल घोलप, पुण्यनगरी चे पत्रकार अलीमभाई शेख पुढारी चे पत्रकार अशपाक शेख होते
या प्रदर्शनामध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांनी आपले वैज्ञानिक मॉडेल बनवून आणले होते. पर्यवेक्षक म्हणून इरफान काझी सर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर सर यांनी केली. तसेच पत्रकार विशाल घोलप यांनी विज्ञान चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख SMC सदस्य इकबाल शेख इलियास शेख अख्तर शेख पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले .







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा