*कळंब- धाराशिव --प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शहरातील बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक (बार्शी नाका) हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व दैनंदिन वर्दळीचा प्रमुख मार्ग असून, या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी दिनकर दादा मुंडे यांनी सुरू केलेल्या जन अमरण उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक हा मार्ग शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. परिसरात शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुले तसेच नव्याने विकसित होत असलेल्या वसाहती असल्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्त्याची अपूर्ण व निकृष्ट अवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
नागरिकांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सोय आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी या रस्त्याचे दर्जेदार व तात्काळ काम होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या कामास त्वरित मंजुरी देऊन लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी एकमुखी मागणी आंदोलनस्थळी करण्यात आली.
यावेळी प्रदीप वीर, नगरसेवक सुनीलजी आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, प्रा. चंद्रजीत जाधव, अमोल सुरवसे, अॅड. योगेश सोने पाटील, उंबरे सर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आंदोलनास पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा