*अकलूज --विशेष प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 199 जयंती उत्साहा साजरी करण्यात आली
🌹-----: जाहिरात:-----👇🌹
या जयंतीनिमित्त महात्मा फुले भाजी मंडई येथे असलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील नगराध्यक्ष रेश्मा ताई आडगळे ,नगरसेवक, नागरिक , सर्व स्तरातील समाज बांधव यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आल
याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य, शितलदेवी मोहिते पाटील, नगरसेवक नामदेव गलांडे नाशिक आबा सोनवणे सचिन देशमुख विलास क्षीरसागर विशाल मोरे मोहसीन शेख उज्वलाताई विटकर तसेच नारायण भाऊ फुले विठ्ठल गायकवाड विशाल फुले राजू एकतपुरे जालिंदर भाऊ फुले, राजू बनकर अविराज राऊत भैय्या मांढेकर ,उत्कर्ष शेटे, दादाभाई तांबोळी , नगरसेवक सर्व समाजातील नागरिक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते
याप्रसंगी अकलूज येथील महात्मा फुले भाजी मंडई नूतनीकरण संदर्भात अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेज सिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे सर्व नगरसेवक व भाजी मंडई मधील भाजीपाला व्यापाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करून व्यापाऱ्यांच्या सहमतीने नूतन भाजी मंडईची इमारत करणार असून यानंतर नगरसेवक सयाजी राजे मोहिते पाटील व भाजी मंडईत मधील व्यापारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन भाजी मंडईचा प्रश्न मिटवण्यात येईल असे याप्रसंगी उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा