Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

लेखक हरिश्चंद्र पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


यशोदा प्रतिष्ठान, संचलित - सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, शेळवे ता. पंढरपूर  यांच्यावतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी देण्यात येणारे कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ललित या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट ५ साहित्यकृतीला पुरस्कृत करण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 कथासंग्रयासाठी -

 काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा - सुरज चौगुले, सांगली,कवितासंग्रहसाठी- जगणे गोंदून घेताना - डॉ. अदिती काळमेख, सातारा 

कादंबरीसाठी- खोल उन्हातली गर्द सावली -  डॉ. वसंत बिरादार, नांदेड 

ललितलेखनसाठी-शब्दांच्या रंगरेषा, निबंध लेखन- युवराज चौगुले, कोल्हापूर 

बालसाहित्यसाठी - बाप्पा माझे ऐका - बा. स. जठार, गारगोटी , अशीच असतात मुलं - शिवाजी बंडगर, सांगोला मराठी साहित्यात दीर्घ लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक - हरिश्चंद्र पाटील , टेंभुर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने तर विशेष सनराईज साहित्य गौरव पुरस्काराने डॉ. शिवाजी शिंदे यांना गौरविण्यात येणार आहे... 

          हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सनराईज पब्लिक स्कूल & ज्यु. कॉलेज, शेळवे ता. पंढरपूर येथे 

आमदार मा- अभिजीत (आबा ) पाटील  माढा मतदार संघ, मा.आमदार. दत्तात्रय सावंत सर , पुणे विभाग शिक्षक मतदार संघ , जिल्हा परिषद सदस्य संतोष - बागल, जिल्हा परिषद सदस्य - अमित साळुंखे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सम्पन्न होणार आहे..

रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे.. 

असे एका पत्रकाद्वारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - समाधान गाजरे, संस्थेचे संस्थापक सचिव, ग्रामीण साहित्यिक - अंकुश गाजरे, संस्थेचे उपाध्यक्ष -अजित लोकरे यांनी जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा