Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ एप्रिल, २०२६

नरसिंहपूर मार्गावर मानाच्या भातंगडीच्या काटीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


----- शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त एखादशीला शंभो महादेवाची भेट घडवून परतीच्या मार्गावर मानाच्या भातंगडीच्या काटीचे ठिक ठिकाणी दर्शन व स्वागतासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. 

    तुळजापूर तालुक्यातील भातंगडीची मानाची काटी अनेक वर्षांची परंपरा जपत गुडी पाडव्याच्या दिवशी निघून पायी सेवेकरी भक्तांच्या सोबतीने ठिक ठिकाणी मुक्काम करत चहा, नाष्टा व जेवणावळीचा मान स्विकारत एकादशी दिवशी शिखर शिंगणापूरात पोहोचून शंभो महादेवाची भेट घेवून परतीचा मार्ग धरला आहे. जसा जाताना पाहुणचार स्वीकारला त्याच पद्धतीने माघारी परतीच्या वाटेवरही पाहुणचार आदरातीत्य स्वीकारत निघाले आहेत.



    बावडा नंतर कालचा टाकळी येथील मुक्काम आटोपून चव्हाणवस्ती, टणू मार्गे दुपारी आडोबावस्ती येथील विसाव्यासाठी पोहोचताच लहान बालके, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. अनेकांनी तर आपली लहान बालके काटीच्या वाटेत झोपवून त्यांच्यावरून काटीला मार्गक्रमणासाठी वाट करून दिली. त्यानंतर नरसिंहपूर, शेवरे मार्गे काटी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

चौकट - भातंगडीची मानाची काटी अनेक वर्षांची परंपरा जपत या मार्गावरून जात असते. परंतु त्यांच्या बरोबर असणाऱ्या सेवेकरी उन, वारा व पाऊसाची तमा न करता अवजड, २५ ते ३० फुट उंचीची काटीची सेवा करत आहेत. त्याला भाविकांच्या वतीने नवस बोलून चांदीचा पट्टा बांधला जातो.

फोटो - आडोबावस्ती येथे मानाची भातंगडीची काटी आली असता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा