Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ एप्रिल, २०२६

सोलापूर शहरातील कुमठा नाका येथील गॅस गोडाऊन समोर नागरिकांचा गोंधळ उन्हात उभारून एक जण बेशुद्ध.....

 *ज्येष्ठ पत्रकार* 

*शहाजहान आतार*

*सोलापूर*



पंधरा दिवसापासून नंबर लावून सुद्धा घरपोच गॅस टाकी मिळत नसल्याने नागरिकांना उन्हात तासान तास उभे राहावे लागत आहे,आज गॅस गोडाऊन समोर नागरिकांनी गर्दी करत गोंधळ घालत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान तीव्र उष्णतेमुळे रांगेत उभे असलेल्या एका इसमाची प्रकृती बिघडून तो बेशुद्ध होऊन खाली पडला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी तात्काळ त्या इसमाला मदत करत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला



. नागरिकांच्या म्हणण्या वेळेवर बुकिंग करून सुद्धा आहे घरपोच सेवा दिली जात नाही. परिणामी नागरिकांना स्वतः गोडाऊन मध्ये जाऊन चार चार पाच पाच तास उभा राहून सिलेंडर घ्यावा लागत आहे. एवढे तास उभारूनही सिलेंडर मिळण्याची खात्री नाही अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून गॅसचा तुटवडा नाही नागरिकांनी रांगा लावू नये सगळ्यांना घरपोच सेवा मिळेल असं सांगितलं जात असताना परिस्थिती मात्र वेगळेच चित्र दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा