Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

*अकलूज नगर परिषद ,प्रभाग क्र. ५ मधील ड्रेनेजची समस्या मार्गी लावा; भाजपच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


अकलूज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील लोहार गल्ली आणि शनी मंदिर परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात तातडीने नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

​आरोग्याचा प्रश्न गंभीर

प्रभाग क्रमांक ५ मधील लोहार गल्ली परिसरात समीर थोरात ते अविनाश लोहार यांच्या घरादरम्यान अंतर्गत गटारीं नसल्याने सांडपाणी व्यवस्था पूर्णपणें कोळंबा झाला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, शनी मंदिराच्या पाठीमागील झोपडपट्टी भागातही ड्रेनेज लाईन निकामी झाल्याने सांडपाणी साचून राहत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन नगरपरिषद कार्यालयीन प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी स्वीकारले

​भाजप आक्रमक

अकलूज शहर भाजप अध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजप सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने यांनी प्रशासनाकडे ही समस्या तातडीने सोडवण्याची आग्रही मागणी केली. "प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र भूमिका घेतली जाईल," असा इशाराही यावेळी देण्यात आला.

​निवेदन देतेवेळी भाजप सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने,

प्रभाग क्रमांक 5

 संतोष टकले, अभिषेक चाबुकस्वार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा