Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

बारामती एमआयडीसी रोडच्या कडेला दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई.. *वाईन्स शेजारी 'ओपन बार' वर कारवाई..!* नागरिकांच्या तक्रारीनंतर_एमआयडीसी रोडवर बारामती तालुका पोलिसांची कारवाई; टपऱ्यांचा बेकायदा बाजार बंद; चार जणांवर खटले

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


     एमआयडीसी रोडवर वैभव वाईन्सच्या शेजारीच रस्त्याच्या कडेला सुरू असलेला 'ओपन बार'चा प्रकार अखेर पोलिसांच्या रडारवर आला आणि एका धडक कारवाईत संपूर्ण बेकायदा असणाऱ्यांनी घाव घालण्यात आला. वैभव वाईन्स यांना सुद्धा लेखी नोटीस देण्यात आली



       सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करत दणका दिला. संतोष शहा (गुड्डू पान शॉप) आणि अशोक लोंढे (मालिक टी टपरी) हे दोघे वैभव वाईन्समधून दारू घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेलाच ग्लास, पाणी व इतर साहित्य विकत देत होते. इतकंच नाही, तर त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यास उघडपणे प्रोत्साहन देत 'ओपन बार'च उभा केला होता. यामुळे परिसरात मद्यपींची वर्दळ वाढून नागरिकांचा त्रास शिगेला पोहोचला होता.

दरम्यान, अशिष वाल्मिकी हा 'अंडा भुर्जी' टपरी व नौशाद मुलानी हा 'नूर चिकन सेंटर'मधून परवान्याविना व्यवसाय करत असल्याचेही उघड झाले. या सर्वांकडून कचरा थेट रस्त्यावर टाकून परिसर अस्वच्छ केला जात होता. नागरिकांच्या सततच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी चौघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) व ११५ अन्वये खटले दाखल केले.     


 कारवाईदरम्यान संबंधितांची वाहने व साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांच्या या कारवाईनंतर एमआयडीसीतील बेकायदा धंदे करणाऱ्यांनी मोठा धसका घेतला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस अंमलदार भारत खारतोडे नितीन ढवण शशिकांत दळवी निलेश वाकळे हनुमंत पाटील दादा दराडे ओंकार भोसले संतोष कांबळे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा