Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

*वेळापूर येथे मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत महोत्सव व पंचाचार्य जगद्गुरूंची अड्डापालखी मिरवणुक व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


वेळापूर येथे हिंदू वीरशैव लिंगायत समाजाचे वंदनीय पंचाचार्य जगद्गुरू यांच्या दिव्यसानिध्यात दि.९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री बृहन्मठ वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर येथे श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री ष.ब्र.१०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत महोत्सव आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           दि-९ एप्रिल रोजी पहाटे ६.०० ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात होईल.पहाटे ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत गुरुगादीस रुद्राभिषेक,सकाळी ८.३० ते ११.०० यावेळेत गणेश याग व महारुद्रयाग स्वाहाकार व श्रीगुरू हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद, सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत भजन- किर्तन व संगीत, दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० नवचंडी याग स्वाहाकार,सायंकाळी ७.३० ते सायंकाळी ७.४५ श्रीगुरूंचे तुलाभार व श्रीगुरू हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद रात्री ८.०० ते ९.०० धर्मसभा असा दैनंदिन कार्यक्रम दि.९ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या तीन दिवसांत आयोजित केलेला आहे...

         दि.१२ रोजी सकाळी १०.०० वाजता अय्याचार व शिवदिक्षा संस्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे.त्यासाठी पूर्व नोंदणी सुरू आहे.तसेच त्याच दिवशी दुपारी ४.०० ते रात्री ८.०० या वेळेत रंभापुरी पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ वीरसिंहासनाधिश्वर प्रसन्न रेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,उज्जैन पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ सद्धर्मसिंहासनाधिश्वर सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी,श्रीशैल पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ सुर्यसिंहासनाधिश्वर डाॅ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी,काशी पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि काशी पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी या पाचही जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा पालखी मैदान ते श्री बृहन्मठ वेळापूर होणार असून त्यानंतर रात्री ८.०० वाजता पंचाचार्य जगद्गुरू यांचे दिव्य सानिध्यात व अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद होईल.

          दि.१३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जगद्गुरू यांच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र. १०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान, सकाळी १०.३० वाजता उपस्थित शिवाचार्य,संतमहंत,सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार होतील.सकाळी ११.०० वाजता शिवाचार्य धर्मसंदेश आणि पंचाचार्य जगद्गुरूंचे प्रमुख आशिर्वचन झाल्यानंतर धर्मसभेची सांगता होवून उपस्थितांना महाप्रसाद होईल.

             तरी सदरच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सर्व सद्गभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरू दर्शनाचा,कार्यक्रमांचा व गुरूकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बृहन्मठ वेळापूरचे नुतन मठाधीपती श्री.ष.ब्र.१०८ सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा