*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
तमिळनाडूतील सथानकुलम पोलीस कोठडीत झालेल्या पिता-पुत्राच्या हत्येप्रकरणी ६ एप्रिल २०२६ रोजी मदुराई सत्र न्यायालयाने ९ दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे.
२०२० मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात तमिळनाडूतील सथानकुलम
येथे पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे.बेनिक्स यांना मोबाईल दुकान
वेळेनंतर उघडे ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणाचा तपास सीबीआयने (CBI) केला होता आणि मद्रास उच्च
न्यायालयाने (Madurai Bench) या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण
प्रक्रियेवर लक्ष ठेवले होते
पोलीस कोठडीत या पिता-पुत्राला अमानुष मारहाण आणि छळ करण्यात आला, ज्यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती.
मदुराईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.
मुथुकुमारन यांनी हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare)
असल्याचे नमूद केले. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा अशा
गुन्ह्यामुळे समाजाचा विवेकाचा आवाज हादरतो,असे ताशेरे
न्यायालयाने ओढले आहेत.
न्यायालयाने दोषी ठरलेल्या सर्व ९ पोलिसांना मृत्यूदंडाची (फाशी) शिक्षा सुनावली असून, मृतांच्या कुटुंबीयांना १.४० कोटी रुपये भरपाई देण्याचे
आदेशही दिले आहेत.
यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बाळकृष्णन,
रघु गणेश आणि इतर ६ कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा