Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ५ एप्रिल, २०२६

*प्रकाश आंबेडकर यांचा मोठा संशय --महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मतदार वगळण्याची शक्यता?*

 **टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


मुंबई : महाराष्ट्रात मतदार पुनर्रीक्षण मोहिमेअंतर्गत (एसआयआर) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या नावाखाली तब्बल २ कोटी ९० लाख मतदार कमी होतील. जर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आली तर त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांच्या निकालावर होऊ शकतो, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

भारत निवडणूक आयोगाची महाराष्ट्रात होणारी एसआयआर मोहीम ही नि:पक्षपातीपणे पार पडावी यासाठी काँग्रेसनच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात काँग्रेसने विशेष पुनरीक्षण मोहीम पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनीही एक्स या समाज माध्यमातून एसआयआरबद्दल शंका व्यक्त केली. विशेष पुनर्रीक्षण ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, दुबार नावे काढण्यासाठी किंवा मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी राबवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की, या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट विचारसरणीच्या किंवा समुदायांच्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक कमी केली जात आहे. आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर फसवणुकीचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी मतदार याद्यांसंदर्भातील मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरून पीडितांच्या भेटी घ्यायला हव्या होत्या. केवळ आरोप करण्यापेक्षा पुराव्यांनिशी हा भ्रष्टाचार उघड करायला हवा होता. सरकारचा खोटरडेपणा उघड करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एसआयआरच्या नावाखाली निवडणूक आयोगाने ज्या एका प्रभागातील मतदार अस्तित्वात नाहीत, असे म्हणून कमी केले आहेत त्या कुटुंबांचा मेळावा घेतला असता तर निवडणूक आयोग फसवणूक करतोय हे सिद्ध करता आले असते. असेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा