*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगड़ूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शिवराज प्र. कदम जहागीरदार यांनी नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री नृसिंह लक्ष्मी देवस्थानला सदिच्छा भेट देऊन परिसराला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
सध्या नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री नृसिंह जयंती व नवरात्र उत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२२ एप्रिल ते २ मे पर्यंत दररोज कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये किर्तन,प्रवचन,भजन,सुगम संगीत,भावगंध संगीत,शहनाई वादन,छबिना व काल्याचे किर्तन कार्यक्रम होणार आहेत.
आज अचानक ॲड. शिवराज प्र. कदम जहागीरदार यांनी देवस्थानला भेट देऊन श्री नृसिंह मंदिरात पुजा त्याचे हस्ते करण्यात आली व नंतर त्यांनी मंदिर परिसराला भेट देऊन पहाणी केली व देवस्थानच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे यांनी शिवराज कदम जहागीरदार यांचा शाल,श्रीफळ व नृसिंह यांची देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विश्वस्त प्रकाश सुरू सर व विश्वस्त अभयकुमार वांकर उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा