Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

टणू येथील कै. लक्ष्मण दासू मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी भेट देऊन कुटुंबीयां समवेत वाहिली आदरांजली

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



----- मनुष्य जिवनामध्ये जन्म व मृत्यू ही गोष्ट न चुकणारी असून प्रत्येकाला त्यातून जाणे क्रमप्राप्त असल्याचे मामासाहेब काजळे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शक उद्भोदनात सांगीतले.

    टणू (ता.इंदापूर) येथील कै. लक्ष्मण दासू मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मामासाहेब काजळे महाराज यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली. यानिमित्त राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी भेट देऊन कुटुंबीयां समवेत आदरांजली वाहिली.



    कै. लक्ष्मण दासू मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सत्यवान दासू मोहिते व कुटुंबियांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यास पंचायत समिती सदस्य शिवाजीराव मोहिते, सोमनाथ मोहिते, बलभिम मोहिते, शितल मोहिते, मारूती मोहिते, महावीर जगताप, सचिन भारत जगताप यांच्या सह टणू पंचक्रोशीतील महिला, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - टणू (ता.इंदापूर) येथे कै. लक्ष्मण दासू मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा