*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आदिनाथ बारामती एग्रो भाडेपट्टी करार होण्यापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीतील धक्कादायक माहिती पाटील गट सभासदांना करुन देणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले. सध्या करमाळा तालुक्यातील राजकारण हे आदिनाथ कारखान्याच्या अवतीभवती फिरत असताना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना घेरण्याचे काम विरोधक करत आहेत. अशातच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आज एक घोषणा करुन चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ कारखान्याच्या दुरावस्थेची चर्चा न होता केवळ आमदार नारायण आबा पाटील यांना टार्गेट करण्याचे काम काही मंडळी करत आहेत. पण आता आमच्याही हाती बरीच माहिती प्राप्त झाली असून ती धक्कादायक अशीच आहे. यातुन माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आदिनाथ बाबत रचलेल्या कुटील डावाबाबत सभासदांना सर्व काही समजलेच पाहिजे. यावेळी या दोघांना दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी दिलेली छुपी साथ सुध्दा हेतुसहीत बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळेच आता पाटील गटाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाणार असुन यात आदिनाथच्या विकासात अडथळा आणणाऱ्या या झारीमधील शुक्राचार्यांचा खरा चेहरा आम्ही उघडा पाडणार आहोत. लवकरच करमाळा तालुक्यातील प्रसिध्दीमाध्यमांना आम्ही खरी माहिती तथ्यासह देणार आहोत. खऱ्या अर्थाने विरोधकांची आदिनाथ बाबतची कुटील नीती जनतेसमोर उघडी पाडणारच असा निर्धार प्रवक्ते सुनील तळेकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा