Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

*पुणे येथील धाराशिव फाऊंडेशन यांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरद इलेक्ट्रॉनिक्स चे प्रमुख तुषार धालगडे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सत्कार*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


पुणे येथील धाराशिव फाऊंडेशन यांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरद इलेक्ट्रॉनिक्स चे प्रमुख तुषार धालगडे यांचा “एक यशस्वी उद्योजक” म्हणून भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार कैलास (दादा) पाटील (लोकप्रिय आमदार, कळंब–धाराशिव मतदारसंघ) यांच्या हस्ते मानचिन्ह प्रदान करून करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी तुषार धालगडे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तुषार धालगडे  हे भारत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेऊरचे माजी प्राचार्य हनुमंत धालगडे यांचे चिरंजीव आहेत.


या प्रसंगी बोलताना आमदार कैलास (दादा) पाटील यांनी, “तुषार धालगडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुणवत्तेची, विश्वासार्हतेची आणि ग्राहककेंद्री सेवेची ठाम ओळख निर्माण केली आहे. सातत्य, नावीन्य आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर उभा राहिलेला वरद उद्योग समूह हा नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे,” असे गौरवोद्गार काढले.

धाराशिव फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजाला दिशा देणाऱ्या आणि रोजगारनिर्मितीत हातभार लावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. स्थानिक ते राज्यस्तरीय पातळीवर उद्योगवाढीस चालना देणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ देणे ही फाऊंडेशनची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे.

सत्कार स्वीकारताना तुषार धालगडे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, ग्राहक, कर्मचारी, डिलर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याला दिले. “ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि भागीदारांचा भक्कम पाठिंबा यामुळेच वरद उद्योग समूह आज या टप्प्यावर पोहोचू शकला आहे. हा सन्मान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या गौरवसोहळ्यामुळे वरद उद्योग समूहासाठी हा क्षण अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा ठरला असून, भविष्यातही गुणवत्तापूर्ण सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि ग्राहक समाधान या त्रिसूत्रीवर काम करत उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा