*निमगाव( मगराचे)- प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-९१३०१०१६०८*
शक्ती पीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राजु शेट्टींच्या आक्रोश सभेसाठी निमगाव व परिसरातुन महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरणार असून
शक्तीपीठ महामार्ग हा निमगाव व परिसरातील संपुर्ण बागायत भागातून जात असल्याने शेतकऱ्यांचे उपजिवेकेचे साधन संपुस्टात येवुन तो उघड्यावर येऊन यांच्या घरादारावर नांगर फिरत असल्याने महिलांनी या शक्तीपीठाच्या विरोधात पदर खोचला असुन आम्हाला शक्तीपीठ मार्ग नको आम्हाला आमची अर्धा एकर का असेना जमीनच हवी आहे पैसा हा टिकत नसतो जवळ राहत नसतो त्यामुळे ज्या शक्तीपीठामुळे आपले जीवन संपणार असुन शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात संपुर्ण ताकदीनीशी विरोध करण्यासाठी राजु शेट्टींच्या
अक्रोश सभेसाठी व पुढील अंदोलनासाठी महिलांनी पदर खोचला असुन वाट्टेल ते झाले तरी हरकत नाही पण शक्तीपीठाला विरोध करणारच आशी ठाम भुमिका महिलांनी घेतली आहे
तसेच शक्ती पीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनीचा मोबदला सरकारकडून मिळेल मात्र आम्ही त्या जमिनीवर पिढ्या न पिढ्याआमचा प्रपंच चालवत असून आम्हाला या शक्ती पीठ मार्गाची काहीही आवश्यकता नाही त्या जमिनीचा मोबदला कितीतरी पटीने आला तरी तो पैसा जवळ राहणार नाही कारण सरकारच्या बोटचेपी धोरणामुळे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात अवैद्य धंद्यांना ऊत आला असून वाड्यावर सुद्धा हातभट्टी दारूचे अवैध धंदे असल्याने प्रत्येक घरातील पुरुष हा व्यसनाधीन बनत चालला आहे जर या शक्तीपीठ महामार्गाचा मोबदला दिला तरी त्या पैशाची उधळपट्टी व्यसनाधीन पुरुष थोड्याच कालावधीत करतील आणि आम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील हेच त्रिवार सत्य असून काहीही झाले तरी आमचा या शक्तीपीठ मार्गाला विरोध असल्याचे मत महिला मांडत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा