Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

जैन जिन शासन स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण, यानिमित्त भगवान महावीर यांचा जयजयकार.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांना केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैशाख शुद्ध एकादशी या पवित्र दिवशी भगवान महावीर स्वामींनी चतुर्विध जैन संघाची स्थापना केली. यावेळी त्यांनी सत्य,  अहिंसा, अपरिग्रह, अचौर्य आणि ब्रह्मचर्य या मोक्षमार्ग साधनेचा दिव्य संदेश संपूर्ण मानवजातीला दिला. या मंगल दिवसाच्या स्मरणार्थ दत्तनगर येथील आनंद दरबार मध्ये आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाखाली जिन शासन स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तीर्थंकर भगवान महावीर यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी अहिंसा परमो धर्म आणि सेवा परमो धर्माचा देखील जयजयकार करण्यात आला. यावेळी नगरसेवक संदीप बेलदरे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे तसेच नगरसेविका स्मिता  कोंढरे या मान्यवरांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



यावेळी नगरसेवक संदीप बेलदरे म्हणाले, भगवान महावीर यांनी सन्मानाने जगा आणि जगू द्या असा संदेश दिला. त्यांनी मनावर देखील कसा विजय मिळवायचा हे दाखवून दिले. आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

यावेळी आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, भगवान महावीर यांनी प्रथम गणधर श्री गौतम स्वामी, प्रथम आचार्य श्री सुधर्मा स्वामी, इतर अकरा गणधर, महासती चंदनबाला यांच्यासह ४४०० श्रमण, आर्यिका यांच्यासह चतुर्विध संघाची सुरुवात करून जैन धर्माचे निरुपण केले.


यावेळी जिन शासन की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी धर्म, अहिंसा आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यानिमित्त जैन समाजाच्या एकतेचे आणि संस्कारांचे दर्शन या उपक्रमातून घडले. यावेळी सुभाष लुनावत, उदय दुगड, प्रकाश भटेवरा, प्रमोद राका, दिपाली चुतर, डॉ. अंकिता धोका, पारसमल धोका आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा