*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
MNC "बॉब्स्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड" ने साऊथ कोरिया येथील प्रकल्पासाठी करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथील अभिजीत मच्छिंद्र जायभाय यांची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकल्पात ते पॅकेजिंग मशीनच्या प्रोटोटाइप बिल्डिंगसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून भारतीय टीमचे नेतृत्व करतील.
त्यांनी यापूर्वीही स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि चीन येथे SAP आणि लीन मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित विविध प्रकल्पांवर काम केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील आदिनाथ कारखान्यावर, तर माध्यमिक शिक्षण लोकमान्य टिळक विद्यालय कराड, व अभियांत्रिकी पदवी,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, येथे पूर्ण केले आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी मच्छिंद्र जायभाय यांचे ते चिरंजीव आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा