*पुणे, डॉ. संदेश शहा**
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
सिन्नर ( जिल्हा नाशिक ) महाविद्यालयातील एच.एस.सी. व्होकेशनल विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. संजय पवार ( डी. लिट. डॉक्टरेट इन लिटरेचर ) यांच्या कुणब्याची गाथा या चरित्रग्रंथास पंढरपूर येथील गीते बाबा प्रतिष्ठान, पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि नवी दिल्ली येथील वर्ल्ड कल्चर अँड इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशनचे आजीव सदस्य डॉ. संजय गीते यांच्या कडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. संजय पवार यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र हे ब्रीद घेऊन राजस्तरीय कॉन्फरन्स यशस्वी संपन्न केली आहे. नाशिक येथे त्यांनी नुकतेच राज्यस्तरीय कवी संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. साहित्य निर्मिती मध्ये देखील त्यांना फार रुची आहे.
या फाउंडेशनकडून सामाजिक संस्थेतर्फे समाजातील विविध क्षेत्रात विशेषतः साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्यात येतो. मान्यवरांच्या हस्ते शाल, गौरवपत्र व सन्मान चिन्ह देऊन संजय पवार यांचा आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मश्री नरहरी कडेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवयित्री व साहित्यिका जयश्री वाघ ( संमेलनाध्यक्षा ), कवी गणितेश्वर, विठ्ठल रहाणे, पुणे येथील मिलेट्स प्रचारक डॉ. संदेश शहा व डॉ. विकास ओझर्डेकर, फाउंडेशनचे प्रमुख डॉ. संजय गीते उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल प्रा. डॉ. संजय पवार यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक प्रवीण जाधव, संस्थेचे सन्माननीय संचालक कृष्णाजी भगत, प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य एस. पी. शेलार यांनी अभिनंदन केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा