*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
अनेक राजकीय नेते,केंद्रीय मंत्री बिल्डर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ते अभिनेत्यांशी (हायप्रोफाईल भक्त) नाव जोडला गेलेला एक कथित 'हायप्रोफाईल गुरू' मनोहरमामा ला पोलीसांकडून पुन्हा एकदा दणका देण्यात आला असून कुर्डवाडी येथे दाखल झालेल्या एका जादुटोणा व फसवणूक प्रकार च्या गुन्ह्यात सोलापूर पोलीसांकडून पुणे येथे मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
भोंदूगिरी करणाऱ्या मनोहर मामा 👆यांचा करमाळा तालुक्यातील घोटी येथील भक्तगण निवास
मनोहर मामा भोसले (पूर्ण नाव: मनोहर उर्फ मामा भोसले) हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी असून ते स्वतःला 'बाळूमामांचा अवतार' म्हणवून घेतात.त्यांनी बाळूमामांची मालिका काढून बाळूमांमाच्या श्रद्धेच्या आडून स्वतःचा दरबार मोठा केला आहे.
त्यांनी उंदरगाव येथे बाळूमामांचे मंदिर आणि एक आध्यात्मिक मठ उभारला आहे. मात्र २०२१ ला दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्हयानंतर उंदरगाव सोडून करमाळा तालुक्यातीलच घोटी गावात आपले बस्तान बसवले होते .अशोक खरात प्रकरणानंतर ते देखील भुमिगत होते. ते ज्योतिषाचार्य असल्याचीही त्यांची ओळख आहे.
२०२१ मध्ये त्यांच्यावर भाविकांची आर्थिक फसवणूक आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचे गंभीर आरोप झाले होते.कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याचा दावा करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली होती.या प्रकरणांमध्ये त्यांना नंतर सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला.
शरदचंद्र पवार सुप्रिया सुळे,नाना पटोले, नितिन गडकरी,एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील मनोहर मामांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक आमदार खासदार मंत्री मनोहरमामांच्या पायी लिन होतात. विशेष म्हणजे बलात्कार व फसवणूक चा गुन्हा दाखल झाल्यानंतर या मनोहर मामांच्या लोकप्रियेत प्रंचड वाढ झाली आहे. महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य निर्माण झाले आहेत. त्यांच्या दरबार ला प्रचंड गर्दी व अलिशान गाड्यांनी मैदान भरलेले अनेक व्हिडीओ आहेत.
सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे 'manoharmamaofficial' नावाचे Instagram आणि Facebook पेज आहे, जिथे त्यांचे अनुयायी त्यांच्या उपक्रमांचे व्हिडिओ शेअर करत असतात.
सिने सृष्टीशी निगडित अनेक अभिनेत्यांनी त्यांचे पाय धूवून मोठमोठे हार घालून पुजा केलेले व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या गाणगापूर येथे देखील भव्य मठ स्थापन केला असून तिथे देखील दरबार पुजा अर्चना होम हवन होत असल्याचे व्हिडीओ त्यांच्या पेजवर आहेत.
*ठळक मुद्दे:*
. *गुन्ह्याचे स्वरूप:* व्यवसायात भरभराटीसाठी पूजा-विधी सांगून 2 लाखांची मागणी,50 हजार घेतले. जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा.
*पोलिसांचे आवाहन:* "अजून कोणाची फसवणूक झाली असेल तर पुढे या, कारवाई करू" - *पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी.*
पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत कसून चौकशी करून अटक केली. उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा