Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ एप्रिल, २०२६

*व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १९५ रुपयांची वाढ--मात्र सोलापूर जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीत*

 मुख्य संपादक 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448



गेल्या जवळपास एक महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसताना दिसून येत आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे जगातील अनेक देशांत ऊर्जा संकट ओढवण्याची शक्यता आहे. 


 भारतातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच आता भारतातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शासनाने १ एप्रिल पासून. १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होईल अशी शासनाने ग्वाही  दिली होती  मात्र व्यवसायिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध न  झाल्याने व्यावसायिकांची उपासमार होत आहे शिवाय गॅसवर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यामुळे संबंधित मजुरांची उपासमार होत आहे तरी व्यवसायिकांना गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत असून व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद असल्याने त्याचा भार घरगुती गॅसवर पडत आहे शिवाय वितरकांच्या नियोजन आभावी  घरगुती गॅस सिलेंडर साठी भर उन्हात लांबच लांब रांगा लागत असून वितरणाचे ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. शिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर साठी एक दोन दिवसाची मजुरी बुडवून रांगेत उभे राहावे लागत आहे आणि त्या ठिकाणी गॅस ग्राहक उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याचेही घटना वाढत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा