Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

सुनील माळी हे विद्यार्थी प्रिय आदरयुक्त शिक्षक, त्यांनी अनेकांचे आयुष्य घडविले, संस्थेत आदर्श सेवा केली : सचिव ॲड मनोहर चौधरी.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९


समाजात चांगली पिढी घडविण्याचे अनमोल कार्य शिक्षक करत असतात. त्या पार्श्वभूमीवर सुनील माळी हे विद्यार्थी प्रिय आदरयुक्त शिक्षक असून त्यांनी अनेकांचे आयुष्य घडविले तसेच संस्थेत आदर्श सेवा केली असे प्रतिपादन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड मनोहर चौधरी यांनी केले.


इदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित 

महात्मा फुले विद्यालय बिजवडी ( तालुका इंदापूर) येथील सहशिक्षक सुनील भागवत माळी हे वयोमानानुसार निवृत्त झाले. त्या निमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुनील माळी सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


ॲड मनोहर चौधरी पुढे म्हणाले, शिक्षणातून सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात.विद्यार्थ्यांनी शिस्त व चांगले विचार आत्मसात करावे यासाठी ते प्रयत्न करत असतात. सुनील माळी सर यांनी आपल्या योगदानातून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात सेवा देत असताना अनेक विद्यार्थी घडवले. त्यामुळे अनेक विद्यार्थी आत्मनिर्भर झाले.

माळी सरांनी आपल्या सेवेच्या काळात विद्यार्थी घडविण्याचे कार्य अतिशय चोख व इमानदारीने पार पाडले.  त्यामुळे आज माळी सरांच्या हातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करीत आहेत. सुनील माळी यांनी गणित, विज्ञान व क्रीडा विषयात आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर सुरुवातीची सेवा श्री नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इंदापूर या ठिकाणी ३३ वर्ष व महात्मा फुले विद्यालय बिजवडी या ठिकाणी २ वर्ष ९ महिने अशी त्यांनी सेवा बजावली आहे. सरांच्या सेवेबद्दल प्रशासकीय कामकाजामध्ये शालेय कामकाजात ठसा उटवला. विद्यार्थी प्रिय आदरयुक्त शिक्षक या नात्याने माळी सर यांना ओळखले जाते. त्याचबरोबर श्री नारायणदास रामदास सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव पदाची कारकीर्द देखील त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. त्याचा कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा आहे.

सत्कारमूर्ती सुनील माळी सर म्हणाले, माझा सेवानिवृत्ती मुळे केलेला सत्कार हा संस्थेच्या निरपेक्ष भावनेचा सत्कार आहे. माझ्या विद्यार्थ्यांचा देखील हा सन्मान आहे. संस्थेने मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे.

यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक छगनराव भोंगळे, मच्छिंद्र अभंग, अमोल भिसे, कमाल भाई सय्यद, देविदास यादव तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळा तील आजी-माजी मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास फलपले यांनी तर 

सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  शंकर हुबाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

          -------: जाहिरात:--------👇



___________________________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा