Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ एप्रिल, २०२६

*डॉ. अकोलकर मेडिकल फाउंडेशनच्या पुढाकाराने बारामतीत लहान मुलांसाठी 'धम्माल' उन्हाळी शिबिर*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो. ९९२२४१९१५९*



बारामती येथील प्रसिद्ध डॉ.अकोलकर मेडिकल फाउंडेशन संचलित, डॉ.अकोलकर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर तर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मनोरंजनासाठी विशेष 'समर कॅम्प २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १० एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे.

चार दिवस चालणाऱ्या या शिबिरात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर भर देणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्या दिवशी

उद्घाटन सोहळा, मातीकाम (Mud Activity), बाहुली नाट्य (Puppet Show), ध्यानधारणा (Meditation) आणि नृत्य हे उपक्रम होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी वॉटर फन ॲक्टिव्हिटी म्हणजेच पाण्यातील विविध खेळ होणार आहेत. तिसऱ्या दिवशी

 पालक-पाल्य दिवस असून मुव्ही डे, चित्रकला, पालकां सोबत आर्ट थेरपी आणि विशेष म्हणजे पालकांसाठी देखील 'कौन्सिलिंग सेशन' 

(समुपदेशन) चे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या दिवशी फॅमिली रॅम्प वॉक, डीजे नाईट आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

हे शिबिर बारामती मधील भिगवण रोडवरील 'जरवी आयकॉन' ( तिसरा मजला ), अमरदीप हॉटेल जवळ येथे संपन्न होईल. या संपूर्ण शिबिराची फी म्हणून केवळ १०००/- रुपये स्वागतमूल्य असून, नाव नोंदणीसाठी पालकांनी ८४८२८३१८१९ किंवा ८३२९०२०९५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंदर्भात डॉ. रोहन अकोलकर म्हणाले, आजची युवापिढी ही देशाचे उद्याचे  जबाबदार नागरिक होणार असल्याने त्यांचे मन, मेंदू तसेच मनगट बळकट असणे गरजेचे आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना मोबाईलपासून दूर ठेवून नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी हे शिबिर एक उत्तम संधी आहे.

सेंटरमधील प्रमुख सुविधा (Facilities):

लहान मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी सेंटरमध्ये खालील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत:

ऑक्युपेशनल थेरपी (Occupational Therapy): मुलांची एकाग्रता वाढवणे आणि दैनंदिन कौशल्ये विकसित करण्यासाठी.

स्पीच थेरपी (Speech Therapy): बोलण्यातील अडथळे किंवा उशिरा बोलणाऱ्या मुलांसाठी विशेष उपचार.

पिडियाट्रिक फिजिओथेरपी: शारीरिक हालचालींमधील दोषांवर उपचार करण्यासाठी.

समुपदेशन (Counseling): मुले आणि पालक यांच्यातील नाते दृढ करण्यासाठी आणि वर्तवणूक समस्यांवर उपाय.

सेन्सरी इंटिग्रेशन: मुलांच्या पंचेंद्रियांच्या विकासासाठी खास डिझाइन केलेले उपक्रम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा