*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो. ९९२२४१९१५९*
महाराष्ट्र राज्य
क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर आणि फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक विद्यमाने आयोजित *राज्यस्तरीय शालेय फील्ड आर्चरी स्पर्धा 2025-26* या दिनांक 29, 30 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत इंदापूरच्या रोशन अकॅडमी चा खेळाडू मोहम्मदअनस माजिदखान पठाण याने १९ वर्षीय रिकर्व राऊंड मुलांच्या गटात ३ गोल्ड तसेच एक ब्राँझ मेडल जिंकून स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली.
ओव्हर ऑल - गोल्ड मेडल, मिक्स स्पॉट - गोल्ड मेडल, फाईव स्पॉट - गोल्ड मेडल तसेच सिंगल स्पॉट - ब्राँझ मेडल ही अनस ची चमकदार कामगिरी आहे.
अनस पठाण हा रोशन अकॅडमी, इंदापूर येथे आर्चरी ( धनुर्विद्या) चे प्रशिक्षण प्रशिक्षक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून तो जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर माध्यमिक कॉलेज, कालठण १, इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथे अकरावी सायन्स मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले सर, संस्थेच्या प्रमुख सौ. जयश्री गटकुळ मॅडम, मुख्याध्यापिका सौ. राजश्री जगताप मॅडम आणि इतर शिक्षक, कर्मचारी यांनी अनस चे अभिनंदन केले. इंदापूरचा मानसन्मान उंचावल्याबद्दल इंदापूर शहर व पंचक्रोशीतून सर्व स्तरातून अनस चे कौतुक होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा