Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

*माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेत "क्रांतीसुर्य महात्मा फुले" जयंती साजरी*

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती दि मॉडेल  विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले. 

                 🌹-👇-----:  जाहिरात :------👇🌹


           प्रशालेत सामाजिक समता सप्ताह २०२६ साजरा करण्यात येत असून जयंतीच्या निमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील शिक्षिका वैशाली बनकर,आशा रानमाळ व निशा दळवी यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले. 


       याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे,शिक्षक महादेव एकतपुरे, विजय महाडिक, राजेश कांबळे यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात यावेळी करण्यात आली. त्यानिमित्ताने शिक्षक संजय बांदल यांनी महात्मा फुले यांचे कार्य व महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर यांचे वैचारिक विचार याविषयी विचार व्यक्त करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

         " स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग...., आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग.... हे गीत राजेश कांबळे यांनी सादर केले.या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा