*अकलूज --विशेष प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना 'जय किसान फार्मर्स फोरम' यांच्या वतीने देण्यात येणारा २०२६ चा प्रतिष्ठित "समाज रत्न" पुरस्कार जावेद गफूर पठाण यांना प्रदान करण्यात आला.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जावेद पठाण यांनी केलेले उल्लेखनीय कार्य असुन त्यांचा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 'आमची माती आमची माणसं' या ब्रीदवाक्याला अनुसरुन त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
-🌹👇-----: जाहिरात :------👇🌹
हा पुरस्कार प्रदान सोहळा
नाशिक येथील नेहरू गार्डन येथील प. सा. नाट्यगृहात १० एप्रिल २०२६ रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रा. डॉ. संजय जाधव (संस्थापक, जय किसान फार्मर्स फोरम) आणि इतर मान्यवर उपस्थित होते
या डॉ.पंजाबराव देशमुख समाज रत्न पुरस्काराबद्दल" जावेद पठाण "यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा