पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
पुणे येथील रामायणाचार्य डॉ. संजय सिताराम गीते यांच्या रानफूल या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित काव्यसंग्रहाचे दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत नाशिक रोड, ऋतुरंग भवन सभागृह, बिजनेस बँकेच्या मागे दत्त मंदिर चौक येथे प्रकाशन होत आहे. पुणे रुपीनगर येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक, रामायणाचार्य डॉक्टर संजय सिताराम गीते हे पुण्यातील प्रसिद्ध साहित्यिक, संगीत रामायणाचार्य असून त्यांचे आजपर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रस्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संजय गीते यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावरील भावस्पर्शी, हृदयाला भिडणाऱ्या, शब्दांकणामध्ये ' रानफूल ' या काव्यसंग्रहाची रचना केली आहे. जगाचा पोशिंदा जो शेतकरी, त्याच्यासाठी जगाच्या हृदयामध्ये मातीच्या कणाएवढी देखील जागा नाही, याचे विदारक चित्रण रानफुल संग्रहामध्ये केलेले आहे. रानफूल हा काव्यसंग्रह काव्या पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी प्रकाशित केला असून महाराष्ट्रमध्ये त्याचे अद्याप प्रकाशन झाले नव्हते. त्याचे द्वितीय संस्करण डॉ. श्री. गीते यांनी नाशिक या ठिकाणी ऋतुरंग भवन येथे प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय पवार हे नाशिक मधील प्रख्यात लेखक व डॉक्टरेट इन लिटरेचर, अर्थात ( डी.लीट ) वर्ड कल्चर अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशन नवी दिल्लीने सन्मानित केले आहे. त्यांनी श्री संजय गीते यांना आमंत्रित करून रानफुल चे प्रकाशन नाशिक मध्ये घ्यावे अशी विनंती केल्याने सदर कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षा, नाशिक येथील लेखिका सौ. जयश्री वाघ असून प्रमुख पाहुणे म्हणून सौ. लक्ष्मीताई गरकळ ( अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य भाऊबाबा संघ, पुणे ), आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मश्री नरहरी कडेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, श्रीमती शकुंतला वाघ ( जेष्ठ साहित्यिका नाशिक ) यांच्या हस्ते या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यानिमित्त निरोगी जीवनासाठी मिलेट्स म्हणजे भरड धान्य या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध डॉ. विकास ओझर्डेकर, डॉ. संदेश शहा, स्वयंपाक घरातून कॅन्सर व इतर आजारांना प्रतिबंध या विषयावर ब्ल्यू जय कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण जाधव हे मार्गदर्शन आहेत. या कार्यक्रमास पुणे व नाशिककर साहित्य रसिक, संगमनेर, परिसरातील रसिक उपस्थित राहणार असल्याचे डॉ. संजय गीते व डॉ. संजय पवार यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर हे करणार असून या ठिकाणी खुले कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे. कवी संमेलनामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार असून इतर कवींना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व कवींना आपले नाव नोंदणी करण्यासाठी संयोजक डॉ. संजय पवार ( मो. 9890094760 ) यांच्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा