*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विभागातील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी चि. रचित अलोक फडे याने मंथन या महाराष्ट्रातील जनरल नॉलेज च्या परीक्षा घेणाऱ्या राज्य पातळीवरील संस्थेमध्ये परीक्षेत १५० पैकी १३६ गुण मिळवून महाराष्ट्रात ८ तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ३ क्रमांक मिळवला त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या मार्गदर्शिका सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील व संस्थेचे अध्यक्षा स्वरूप राणी मोहिते पाटील यांनी त्याचा शाल व श्रीफळ देऊन यथोचीत सत्कार व कौतुक केले याप्रसंगी रचित चे आजोबा विजय दोशी ,व पालक आई सौ.नेहा फडे उपस्थित होत्या तसेच संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री जयसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, मुख्याध्यापिका नूर जहा शेख त्यांनीही रचितचे अभिनंदन व कौतुक केले त्याच्या या विजयाबद्दल सर्व स्तरातून त्याचे वर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा