*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष श्री प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
करमाळा येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करमाळा शहरातील फक्त महिला करता निशुल्क देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदर यात्रेचे आयोजन दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी पहाटे तीन वाजता असून यामध्ये करमाळा ते गाणगापूर गाणगापूर ते अक्कलकोट अक्कलकोट ते तुळजापूर तुळजापूर ते करमाळा अशा पद्धतीने करमाळा शहरातील खास महिला करता सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदरची यात्रा ही कोणत्याही पद्धतीचे शुल्क न घेता आयोजित केली आहे सदर यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी नितीन चोपडे 9423791003, सुजय जगताप 9860640648, गणेश फलफले 940 5766762, प्रतीक जगताप 9699 094317, तसेच योगेश राखुंडे 9766 318383 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे
देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निशुल्क देवदर्शन यात्रा मुळे महिलांना एक प्रकारे मोफत देवदर्शन होणार असून जगताप बंधू यांनी आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल करमाळा तालुक्यात सदरचा विषय चर्चेचा ठरला आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा