*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक- मो. ९९२२४१९१५९*
राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या 'गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६' अंतर्गत इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित माध्यमिक आश्रमशाळेने तालुका स्तरावर मध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभियानांतर्गत आश्रमशाळेचे मूल्यमापन विविध निकषांवर करण्यात आले होते, त्यामध्ये आश्रमशाळेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या यशाबद्दल दि.२३ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट, येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात इंदापूरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे - मखरे यांना पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड, जिल्हा सचिव शिवाजी कामथे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी इंदापूरच्या उपप्राचार्या सविता गोफणे, प्रा. रेश्मा झेंडे उपस्थित होत्या.
यानिमित्त प्राचार्या अनिता साळवे - मखरे म्हणाल्या, आश्रमशाळे तील मुलांमध्ये अफाट गुणवत्ता, जिद्द व आत्मविश्वास आहे. त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी आश्रमशाळा सर्वतोपरी प्रयत्न करते. इंदापूरच्या आश्रमशाळेने प्रतिकूल परिस्थितीत देखील गुणवत्तेचे जे मानके प्रस्थापित केले आहेत, ते इतर शाळांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहेत."
हा पुरस्कार म्हणजे आमच्या सांघिक प्रयत्नांची पावती आहे. भविष्यातही आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्ता संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहू."
या यशाबद्दल प्राचार्या, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी
यांचे संस्थाप्रमुख शकुंतला मखरे ऊर्फ काकी, सचिव ॲड. समीर मखरे आदींनी कौतुक केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा