Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

दख्खन चा राजा श्री.ज्योतिबा यात्रा जोतिबाच्या नावाने चांगभलं च्या जयघोषात संपन्न.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर शहरानजीक अकलूज रस्त्यावर असलेल्या श्री.ज्योतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  इंदापूर तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिबाला अभिषेक करून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी जोतिबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष भक्तांनी करत एकच जल्लोष केला. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून हजारो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी जोतिबाचा माळ येथील मंदिरात आले होते. श्री ज्योतिबा ट्रस्ट तर्फे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व सरबतचे वाटप करण्यात आले.                      



. दुपारी ४ वाजता नगराध्यक्ष भरत शहा व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद वाघ यांच्या हस्ते महाआरती होऊन दख्खनचा राजा ज्योतिबा यांचा शाही छबिना ग्रामप्रदक्षणे साठी निघाला. यावेळी पुजारी रोहित जाधव, आश्विन जाधव, संदीप जाधव, बबनराव सूर्यवंशी, बाबासाहेब घाडगे, गोरख शिंदे, नगरसेवक अक्षय सुर्यवंशी, अतुल शेटे पाटील, अण्णा ढावरे. बाळासाहेब उंबरे, नारायण साळुंखे, कैलास कदम, किसनराव भांगे,

हमीद आत्तार, महादेव चव्हाण, भारत बोराटे जोतिराम सुर्यवंशी

मंगेश औताडे, हनुमंत बोंगाणे, शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, हनुमंत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा