*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
तुळजापूर तालुक्यात व शहरात गॅस बुकिंग करूनही नागरिकांना दहा ते वीस दिवस घरपोच सिलेंडर मिळत नाही. एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी रांग लावून दिवस घालवावा लागते तसेच तुळजापूर शहरातील व तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरणाऱ्यांच्या रांगा दिसत आहेत. पुरवठा कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे आगामी काळात गॅसचा भडका ओढवण्यापूर्वीच शासनाने गॅस व पेट्रोल, डिझेल याचा पुरवठा सुरळीत व जलद करावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही.याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. असे निवेदन *आखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाकडून महाराष्ट्र राज्य सचिव मा.तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन* यांनी धाराशिव जिल्हा अधिकारी व तुळजापूर तहसिलदार यांना दिलेआहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा