Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

*शरदचंद्रजी पवार यांच्या गटातील आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट* *सदर भेटीने करमाळा तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण.....*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकी पासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा पासून अलिप्त असलेले करमाळा तालुक्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.या आगोदर आमदार नारायण पाटील यांच्या सल्लागार कमिटीतील विश्वासू कार्यकर्त्यांंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते.महाविकास आघाडीच्या बॅनर वर विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर आमदार पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना देखील राष्ट्रवादी च्या बॅनरवरच लढवून जिंकला होता .मात्र कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे युवानेते कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी संजयमामा शिंदे व सुभाष गुळवे यांना सहकार्य केले होते .जामखेड तालुक्यातील बारा गावात आदिनाथ च्या सभासदांची संख्या लक्षणीय आहे.आमदार पाटील तेव्हा पासून राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे.जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकीत नारायण पाटील यांनी मोहिते-पाटील गटाची व राष्ट्रवादीची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढवली होती.सध्या आदिनाथ कारखाना कर्जाच्या संकटात असून नुकतीच लिलावसाठी नोटीस निघाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार नारायण पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची माणली जात आहे.

विशेष म्हणजे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख देखील यावेळेस उपस्थित होते.मात्र विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र या प्रसंगी उपस्थित नव्हते.या मुळे चर्चा रंगली आहे कारण बागल गट सध्या गोरे यांच्याशी जवळीक साधून आहे.

नुकताच माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे भाजपचा पंचा असलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या करमाळा तालुक्यातील प्रमुख बागल गट देखील भाजप मध्येच आहे.त्यात आज आमदार नारायण पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा