Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

*करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर बाबा भोसले यांचा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावा घोटी ग्रामस्थांची ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी....*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर मामा भोसले यांचा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील घोटी येथील सरपंच विलासराव राऊत यांनी एका निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे 


निवेदनात सरपंच राऊत यांनी पुढे असे म्हटले आहे की घोटी येथे मनोहर भोसले हा गेल्या पाच वर्षापासून आश्रम चालू असून सदर आश्रमात अमावस्या पौर्णिमेला मनोहर भोसले येणाऱ्या लोकांचे भविष्य सांगून जादूटोणा करीत असल्याचे ऐकण्यात येत आहे सदर आश्रमात राजकीय क्षेत्रातील तसेच वेगवेगळे सेलिब्रेटी लोक वारंवार येत असतात त्याचप्रमाणे परराज्यातील काही लोक देखील आश्रमात वास्तव्यास आहे परंतु आमच्या गावातील स्थानिक नागरिक आश्रमात जात नाही किंवा मनोहर भोसले चे संपर्कातही नाहीत सध्या मनोहर भोसले वर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून कारवाई करण्यात आली आहे तेव्हा कृपया मनोहर भोसले प्रमाणेच सदर आश्रमाची देखील चौकशी करून सदर आश्रम कायमस्वरूपी बंद करून कारवाई करण्यात यावे अशी मागणी सरपंच यांनी राऊत यांनी निवेदनाचे शेवटी केली आहे



भोंदू मनोहर भोसलेंसह साथीदाराचा👆👆 पोलीस कस्टडीतला मुक्काम वाढला; ट्रस्टच्या कॅशियरलाही अटक,तिघांनाही माढा न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलीस कोठडी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा