Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

*तुळजापूर आगारात नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



तुळजापूर आगारास   नवीन एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी तुळजापूर तालुका शिवसेनाप्रमुख. (एकनाथ शिंदे)

यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे स्थान असून, येथे राज्यभरातून लाखो भाविक नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. चैत्र पौर्णिमा, नवरात्रोत्सव, तसेच दर पौर्णिमेला येथे प्रचंड गर्दी असते. भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी तुळजापूर आगारातून बसेसची संख्या वाढवणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रोज शहरात येतात. सध्याच्या बसेस अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही, परिणामी त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून सकाळी येणाऱ्या आणि संध्याकाळी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बस फेऱ्या सुरू करण्याची तातडीची गरज आहे.


तरी मा. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री महोदय, तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी खालील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे

शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढील प्रमाणे मागण्या

१. तुळजापूर आगाराला नवीन बसेसचा ताफा मिळावा.

२. ग्रामीण भागातून तुळजापूरकडे येणाऱ्या बस फेऱ्यांत वाढ करावी.

३. भाविकांच्या गर्दीच्या वेळी विशेष बसेसची सोय करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा