Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

आवाटी गावचे ग्रामदैवत हजरत सय्यद आबेद अली शहा कादरी रहै (फकीर बाबा) यांचा उरूस उत्साहात साजरा

 *करमाळा-+ प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो-9730867448*



आवाटी तालुका करमाळा येथील आवाटी गावचे ग्रामदैवत हजरत सय्यद आबेद अली शहा कादरी रहै (फकीर बाबा) यांचा ऊस सालाबाद प्रमाणे दिनांक 23 व 24 एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गावची ग्रामदैवत यात्रा असल्याने बाहेरगावाहून भक्त सदर उरुसात सहभागी होतात.

दिनांक 23 एप्रिल रोजी जनाब जाकीर हुसेन आदम शेख यांचे येथून सायंकाळी नऊ वाजता चादर,गिलाफ व संदल दर्गा येथे आणून येथून संदल चादर गिलाफ व फातेहा पठण करून दर्गा येथे सायंकाळी 9:45 वाजता समारोप झाला. दिनांक 24 एप्रिल 26 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता दर्गा येथून घोडा वरती संदल चादर दर्गाचे मानकरी श्री बाप्पा आप्पाराव शिंदे यांच्या हस्ते घोडावर चादर चढून संदल ची सुरुवात झाली. त्यानंतर गावात मिरवणूकित फिरून सायंकाळी ठीक नऊ वाजून 45 मिनिटांनी घोडावरील संदल दर्ग्यावर चढवण्यात आला. चादर गिलाफ संदल दर्गावर चढवण्यात येऊन धार्मिक विधी पार पाडून उरुसाची सांगता करण्यात आली.

 सदर संदल मिरवणूकीमध्ये झंकार बँड, वीट तालुका भूम, अब्दुल रजाक बँड करमाळा चे खास आकर्षण झाले. सदरचे उरूसचे सर्व कार्यक्रम हे हजरत सय्यद आबेद अली शहा कादरी दर्गा व कब्रस्तान आवाटीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हसन महबूब सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली मुशीर अहमद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वकफ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी रीतसर परवानगी दिल्यानंतर मा.पोलीस निरीक्षक करमाळा यांनी रीतसर परवानगी दिल्यानंतर दर्गा वरून घोडा वरील संदलची मिरवणूक मोठ्या गाजावाजात निघाली. सदर दर्गाची उरुसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई दर्गासह मारुती मंदिर महादेव मंदिर यावर करण्यात आलेली होती. 

सदरची ग्रामदैवताची यात्रा चेअरमन राजू खान, मकाईचे संचालक गोकुळ नलवडे, सरपंच इमरान जिगर खान, उपसरपंच तन्वीर शेख, दीपक बंडगर, भैरवनाथ बंडगर, श्रीराम खताळ, शिवाजी सूळ,  बडेमीया पटेल, माजी सरपंच दादासाहेब बंडगर, माजी उपसरपंच संतोष सोनवणे, राजाभाऊ शिंदे, हनुमंत शिंदे, अक्षय शिंदे, यशवंत सूळ, दशरथ शिंदे सर्व ग्रामस्थ व कमिटीचे सदस्य लतिफ पटेल, जमीर पटेल, मोहम्मद सय्यद यांचे देखरेखीखाली शांतता शांततामयरीत्या संपन्न झाला

संपूर्ण कार्यक्रम जिल्हा वकफ अधिकारी फरादिन काझी साहेब यांच्या देखरेखीत व ऍड. अलीम पठाण यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा