उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे,आयोजित दि.१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट काव्य लेखन केल्याबद्दल ॲड.फरहीन खान पटेल यांना "भीमरत्न साहित्य गौरव पुरस्कार २०२७ "जाहीर करण्यात आलेला आहे.हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक संदीप जगताप यांच्या हस्ते पुढील वर्षाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२७ रोजी देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल ॲड.फरहीन खान-पटेल यांचे विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल यापूर्वी शासकीय,व विविध संस्थांच्या वतीने राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा