Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

माळीनगर येथील हजरत पठाणशा बाबा रहीमतुल्ला अलै यांच्या उरुस निमित्त.संदल, कव्वाली,आणि महाप्रसादाचे आयोजन.*

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



सालाबाद प्रमाणे साजरा होणारा माळीनगर संग्राम नगर येथील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असणारे हजरत पठाणशा बाबा रहीमतुल्ला अलै यांचा  उरुस दिनांक  १८  एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार असून त्यानिमित्त दिनांक 17 एप्रिल रोजी संदल चा कार्यक्रम होणार असून दि:-१८  एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता बारामती येथील सुप्रसिद्ध कवाली यांचा शानदार वाली चा कार्यक्रम होणार आहे




     या उरुस  निमित्त अकलूज माळीनगर लुमेवाडी बोरगाव वेळापूर बावडा इंदापूर तसेच सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील हजारो हिंदू मुस्लिम भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात   या  उरुस साठी येणाऱ्या हिंदू मुस्लिम भाविकांसाठी सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचे आयोजन "हजरत पठाशा  बाबा" दर्गाहाचे सेवक जाफरभाई सय्यद यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा चे संस्थापक अध्यक्ष व सेवक" जाफर भाई सय्यद "(वायरमन)आणि मुस्लिम जमात माळीनगर, संग्रामनगर बहुजन बांधवांच्या वतीनेकरण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा