Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

दि मॉडेल विविधांगी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश

 

उपसंपादक - नूरजहाँ शेख 

टाइम्स 45  न्यूज मराठी



दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित  दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन भविष्यातील स्पर्धा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी भाग घेतलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून संस्थेचे व प्रशालेचे नाव उज्वल करून मानाचा तुरा खोचला. 

      मंथन पब्लिकेशन मार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत स्वराज अमित सावंत(इ.७ वी)याने ३०० पैकी २८० गुण घेऊन राज्यात ६ वा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. सरताज सलीम मुलाणी (इ.७ वी)याने ३०० पैकी २१२ गुण घेऊन केंद्रात पहिला नंबर मिळविला. हसत खेळत प्रकाशन मार्फत घेण्यात आलेल्या अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वराज अमित सावंत याने ३०० पैकी २६० गुण मिळवून राज्यात  ९ वा क्रमांक मिळविला. प्रणव प्रशांत  देवकर (इ.७ वी)याने ३०० पैकी २३० गुण मिळवून जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळविला. सरताज सलीम मुलाणी याने ३०० पैकी २३० गुण मिळवून जिल्हात ७ वा क्रमांक पटकाविला. अक्षरभारती प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत स्वराज अमित सावंत याने ३०० पैकी २७६ गुण मिळवून राज्यात २ रा क्रमांक मिळविला. प्रणव प्रशांत देवकर याने ३०० पैकी २६२ गुण मिळवून तर सरताज सलीम मुलाणी याने ३०० पैकी २३२ गुण घेऊन केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला. तसेच ए टी एस सी प्रकाशन तर्फे या A T S E स्पर्धा परीक्षेत स्वराज अमित सावंत याने ३०० पैकी २७६, प्रणव प्रशांत देवकर याने ३०० पैकी २५६ गुण घेऊन तसेच सरताज सलीम मुलाणी याने ३०० पैकी २३४ गुण घेऊन यश मिळवले. सांगली शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या टी एस सी परीक्षेत सरताज सलीम मुलाणी याने ३०० पैकी २५६ गुण घेऊन राज्यात ७ वा क्रमांक मिळविला तसेच ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेले ज्युनिअर न्यूटन स्पर्धेत सरताज सलीम मुलाणी याने ३०० पैकी २३२ गुण घेऊन केंद्रात २ रा क्रमांक, सुजित संतोष पाटोळे T E S स्पर्धा परीक्षेत ३०० पैकी २२८ गुण मिळविले. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका रजनी चौरे,  स्कॉलरशिप विभागाचे नवनाथ गायकवाड, अभिजीत हेगडे,तसेच विषय शिक्षक,शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. 

     यावेळी यशस्वी स्पर्धकांचा सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपप्राचार्य रितेश पांढरे,शिक्षक संदीप गदादे, नवनाथ गायकवाड, संतोष पाटोळे, संजय पवार, रजनी चौरे, मेघा जोशी, वैशाली बनकर, वैशाली पांढरे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले.

             या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक अनिल रासकर, प्रकाश गिरमे, ऍड.सचिन बधे, डॉ. अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, कल्पेश पांढरे, लीनाताई गिरमे, विश्वस्त मंडळ व प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा