Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

*अकलूज येथील बागवान सहारा फाउंडेशनच्या वतीने ७ जून रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन-- प्रत्येक जोडप्यास २५ हजार रुपयांच्या संसार उपयोगी वस्तू भेट देणार*

*मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


अकलूज येथील बागवान सहारा फाउंडेशन च्या वतीने दिनांक ७ जून २०२६ रोजी सामुदायिक विवाह चे आयोजन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच अकलूज नगर परिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून हा सामुदायिक  विवाह सोहळा,अकलूज- आनंदनगर येथील "आनंदी गणेश मंगल कार्यालयात"दि. ७  जून २०२६  रोजी सायंकाळी  ५  वाजता संपन्न होणार आहे सामुदायिक विवाह समारंभात विवाह करणाऱ्या प्रत्येक वधू वर जोडप्याला २५ हजार रुपयाचे संसार उपयोगी गृह वस्तू भेट देण्यात येणार असल्याचे बागवान सहारा फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले


महागाईच्या काळात वधू वर पित्यांना   विवाह सोहळा पार पाडणे जिकरीचे ठरत हा विवाह सोहळा पार पाडे पर्यंत पित्यांना तारेवरची कसरत केल्याप्रमाणे वाढवलं खर्च करावा लागत असतो लग्नात हे नाही केले तर समाजात आपले नाव खराब होईल या धास्तीने मुला मुलीची आई वडील वेळप्रसंगी कर्ज काढून आपल्या मुला मुलींची लग्न करत असतात मात्र अलीकडच्या काळात प्रत्येक गावात सामुदायिक विवाह करणाऱ्या संस्था संघटना पुढे येत असून वधू-वरांच्या पालकांना दिलासा मिळत असून त्याच अनुषंगाने मागील वर्षापासून बागवान सहारा फाउंडेशन हे पुण्य कार्य करत  आहेत  "आओ निकाह को आसान करे हे" ब्रीदवाक्य  आणि ध्येय उराशी बाळगून सहारा बघून फाउंडेशन चा दुसरा भव्य असा इज्तेमाई शादी (सामुदायिक विवाह) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बागवान सहारा फाउंडेशन च्या वतीने देण्यात आली


या सामुदायिक  विवाह सोहळ्यात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विवाह सोहळ्या नंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे

हा सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी बागवान सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष पदाधिकारी समाजातील युवक व कार्यकर्ते प्रयत्न करीत असून या सोहळ्या मध्ये विवाह नोंदणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन  केले आहे 


या सामुदायिक विवाह सोहळ्यात जे वधू वर सहभागी ‌ होणार आहेत त्यांनी नाव नोंदणीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

तोहीद (मुन्ना) चौधरी अध्यक्ष ९८६०८०६०८१

हाजी नाजीर हुसेन मोहोळकर उपाध्यक्ष ९७३०३९९८८६

तनवीर तांबोळी सचिव ९८९०५६८००४

आलिम बागवान सहसचिव ९९७०१८१७८९

नाजिम खान खजिनदार ९८९०७०२०९५

अखिल बागवान सदस्य ९९२२५२६३४०

६ रफिक तांबोळी सदस्य ९१७५०२७५५५

जावेद बागवान सदस्य ८२६३००९९६६

जुबेर बागवान सदस्य ७७०९०८५१०४

दिलदार मोहोळकर सदस्य ८६००२१०९००

साहिल बागवान सदस्य ९७३०९८०५८६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा