Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

*निसर्ग संवर्धन उपक्रमांस सहकार्य करणार – चेअरमन महेश इंगळे स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट* *यशकल्याणी नेचर काँझर्वेशनच्या वतीने महेश इंगळे व अमोल. राजेभोसले यांचा जेऊर येथे सन्मान* *पक्षीसंवर्धनासाठी मदतीची ग्वाही*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


निसर्गसंवर्धन ही अत्यंत महत्त्वाची बाब असून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट मंदिर समितीचे चेअरमन महेश (मालक) इंगळे यांनी केले.

यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटी, करमाळा यांच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचा जेऊर (ता. करमाळा) येथे पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी साळुंके परिवारातर्फे पक्षी प्रतिमा भेट देऊन तसेच जोधपुरी फेटा बांधून दोघांचा गौरव करण्यात आला. पक्षीसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या यशकल्याणी नेचर काँझर्वेशन संस्थेस मदत करण्याची ग्वाहीही यावेळी महेश इंगळे यांनी डॉ.गणेश करे-पाटील यांना दिली.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून देवस्थान समितीचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती भारतराव शिंदे पाटील, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील, सोलापूर जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लवंड, प्रयोगशील शेतकरी मा. श्री. नितीन तकिक पाटील, आजी-माजी सैनिक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, जीवन शिक्षण फाउंडेशनचे संस्थापक प्रा. जयेश पवार , प्रसिद्ध सूत्रसंचालक व निवेदक प्रा. विष्णु शिंदे सर , मीरा एंटरप्राइजेसचे सौरभ देशमुख, को जन. इंजी मा.श्री दिपक देशमुख ,उदयोन्मुख पक्षीमित्र विराज साळुंके व अभयसिंह निंबाळकर यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा