Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

*हार फेटे न घेता शैक्षणिक साहित्य वाढदिवसानिमित्त स्वीकारणे* *हा स्तुत्य उपक्रम*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



युवा नेते संजय उर्फ अण्णा सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार फेटे न स्वीकारता शैक्षणिक साहित्य स्वीकारायचा निर्णय घेतला असून आज वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच जवळपास एक लाख रुपयांच्या 5000 वह्या वाढदिवसानिमित्त जमा झाले आहे 

 आज महेश चिवटे यांनीही शंभर कंपास पेटी पप्पू सावंत यांना भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 

 यावेळी जेष्ठ पत्रकार नासिर कबीर 

 करमाळा परिसर चे संपादक सचिन दादा जवरी 

 भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद महानवर नगरसेवक तथा सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत उपस्थित होते

 करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ मोहनीताई संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरात नवनवीन विकासाची कामे मार्गी लागत असून याची सर्व श्री पप्पू सावंत यांची आहे 

 त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना मानसन्मान देऊन 

 नम्रता अंगी बाळगल्यामुळे त्यांनी स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले व 9 नगरसेवक निवडून आणले 

 येणाऱ्या काळात सावंत घराण्याचा धबधबा शहरात वाढेल व मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहतील असा विश्वास यावेळी चिवटे यांनी व्यक्त केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा